‘ऑक्सीजन पार्क’ तळेगावसाठी फुफ्फुसांचे कार्य करेल

0

तळेगाव दाभाडे ।  तळेगाव दाभाडे नगरीमध्ये ‘ऑक्सीजन पार्क’ची उभारणी केल्याने हा पार्क तळेगावमध्ये फुफ्फुसांचे कार्य पार पाडेल, असा विश्वास तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब तळेगाव दाभाडेच्या वतीने ऐश्वर्या गार्डन रिसार्टच्या मागील बाजूला तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या दोन एकर जागेत सदर ऑक्सीजन पार्कची निर्मिती होणार असून याप्रसंगी शेळके बोलत होते.

या ठिकाणी 167 झाडांची शास्त्रीय पध्दतीने लागवड करण्यात आली. ही लागवड व त्याचा पुढील तीन वर्षाचा देखाभालीचा खर्च उपनगराध्यक्ष सुनील शेळके हे करणार आहेत. या ऑक्सीजन पार्क मध्ये संपूर्ण जागेत उभे – आडवे वृक्षारोपण करुन जंगलाप्रमाने निसर्गरम्य परिसर निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यावरण पूरक व् पक्षाना मोहित करणारी ताम्हण, बहावा, पिंपळ, जांभूळ, कडूनिंब, आशा निवडक वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष महेश महाजन, यादवेंद्र खळदे,विलास जाधव, कमलेश कार्ल्रे, शंकरराव जाधव, ज्ञानेश्वर पाटिल, दीपक शहा,विश्वनाथ मराठे, जयंत देशपांडे अदि उपस्थित होते.