ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

SBI च्या 'कोविड-19; द रेस टू फिनिशिंग लाईन' अहवालातील शक्यता

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्रता ओसरत असताना देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असून ती सप्टेंबरमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. ‘कोविड-19; द रेस टू फिनिशिंग लाईन’ या नावाने स्टेट बँकेच्या संशोधकांनी एक अहवाल तयार केला आहे. त्यामध्ये ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्याची आकडेवारी पाहता, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची रोजची रुग्णसंख्या 10 हजारांच्या घरात असेल.  ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत जाणार असून सप्टेंबरमध्ये ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे असं या अहवालात सांगितलं आहे.  मे महिन्याच्या 7 तारखेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तीव्रता गाठली होती असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला. त्या लाटेच्या तुलनेत 1.7 पट तीव्र अशी कोरोनाची तिसरी लाट असेल असं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन सांगता येतं. कोविड प्रतिबंधात्मक नियामांचे पालन न केल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट शिगेला पोहोचू शकते, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.