ऑगस्टमध्ये निवृत्त ?

0

कार्डिफ । आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील भवितव्यावर निर्णय घेण्यासाठी ऑगस्टमध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या पदाधिका-यांशी दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स चर्चा करणार आहे. पुढील काही वर्षात आणखी काय शक्य आहे, यावर विस्तृत विश्लेषण करणार आहोत, असे डिव्हिलियर्स म्हणाला. विश्वातील या महान फलंदाजाने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच ब्रेक घेतला आहे. त्यानंतर 2019 विश्वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवत त्याने कसोटीमधून बाहेर राहणे पसंत केले.