मुंबई-सध्या यूपीए सरकारच्या काळातील ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याने पुन्हा डोकेवर काढले आहे. ख्रिश्चिअन मिशेल हा परदेशी व्यक्त ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा आहे. या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाला आहे. इडीने कोर्टासमोर असे सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते माधव भंडारी, केशव उपाध्ये, गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.
इडीच्या म्हणण्यानुसार आज देशभरात भाजपचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहे.
इटालिअन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचे नाव आले आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे. ख्रिश्चन मिशेलला ताब्यात घेतल्यानंतर इडी त्याच्याकडे चौकशी करीत असून चौकशीदरम्यान तो माहितीही देत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिशेलने आपल्या एजन्सीसमोर जे खुलासे केले आहेत. तसेच जे कोर्टाला सांगितले आहे, यात सोनिया गांधींसजे नाव आहे. यामध्ये इटालिअन लेडी त्यांचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतो, असा उल्लेख आला आहे. यावरुन यात गांधी कुटुंबाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
Interaction with media on #AgustaWestland https://t.co/f3uffHzAyv
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2018
या हेलिकॉप्टर घोटळ्यात कालपर्यंत राहुल गांधी एचएएलच नाव घेत होते. यात एचएएलच नाव होते, मात्र, त्याला दुय्यम स्थान देण्यात आले होते. दुसरी एक बाब यात समोर आली ती म्हणजे, मिशेलने त्याच्या वकिलांना एक चिठ्ठी दिली, त्यात त्याने सोनिया गांधींच्या संदर्भात काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याची उत्तरे कशी द्यायची हे त्यानं विचारले. जर सोनिया गांधी यांच्यात सहभागी नसतील तर त्याने हे का केले, असा सवाल यावेली फडणवीस यांनी विचारला.