नवी दिल्ली : इटलीतील मिलान न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी, बिचोलिए क्रिश्चियन मिशेल, ऑगस्टा वेस्टलँडचे माजी उच्चाधिकारी गियूसेपे ओरसी आणि ब्रुनो स्पेगनोलिनी यांच्यासहीत सर्व आरोपींना निर्दोष ठरवले आहे. यातील जुसपे ओरसी आणि ब्रूनो हे प्रमुख आरोपी असल्याचे बोलले जात आहे. पुराव्यांअभावी कोर्टाकडून आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. या निर्णयामुळे मोदी सरकारला मोठा झटका मिळाला आहे.
ठोस असे पुरावे नाहीत
या व्यवहारात फिनमेकनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी यांच्यावर लाच दिल्याचा आरोप होता. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचेह सिद्ध व्हावे यासाठी लागणारे ठोस असे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने सांगितले. या व्यवहारामुळे भारताला नुकसान झाल्याचेही इटलीच्या न्यायालयाने फेटाळले आहे. मात्र दुसरीकडे, ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर करारामुळे नुकसान झाल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला होता. इटलीतील कोर्टाचा हा निर्णय भारताला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
भारतातील खटला कमकुवत होऊ शकतो
याप्रकरणी भारतातही खटला सुरू आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी मिलान कोर्टाच्या या निर्णयामुळे सीबीआयचा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सीबीआयची माजी वायुसेना प्रमुख एसपी त्यागी यांच्यासहीत अनेक आरोपींविरोधात चौकशी सुरू आहे. काँग्रेसदेखील आगामी काळात सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल करु चढवू शकते. 2 जी घोटाळानंतर व्हीव्हीआयपी ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणातही न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही घोटाळे यूपीए सरकारच्या काळात झाले होते.