ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात ख्रिस्तियन मिशेलने घेतले कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव !

0

नवी दिल्ली-एनडीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात गाजलेले प्रकरण म्हणेज ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा. सत्ता जाऊन देखील कॉंग्रेसमागील शुक्लकाष्ट संपत नसल्याने दिसून येते. आता पुन्हा मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने लाचखोरीचा हिशेब असलेल्या ‘डायरी’त कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे असा दावा ईडीने केला आहे. ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे, यात हा दावा करण्यात आला आहे.

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ईडीने चौथे आरोपपत्र दाखल केले. डायरीत नोंदवलेल्या ‘Fam’ या संक्षिप्त नावाचा अर्थ फॅमिली म्हणजेच कुटुंब असा आहे. तसेच डायरीत नोंद केलेल्या संक्षिप्त शब्दांचा संबंध हवाई दलाचे अधिकारी, नोकरशहा, संरक्षण मंत्रालयातील अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या लाचप्रकरणाशी आहे, असं ईडीने सांगितले आहे.

आरोपपत्रात आणखी ३ नावे

‘AP’ हे एका नेत्याचं नाव आहे. तर ‘Fam’ म्हणजे एक कुटुंब आहे, असा ईडीचा दावा आहे. या पुरवणी आरोपपत्रात आणखी तीन नावांचा समावेश केला आहे. त्यात मिशेलचा बिझनेस पार्टनर डेव्हिड सिम्स आणि त्यांचा मालकी हक्क असलेल्या दोन कंपन्या आहेत.