सीबीआयचा दावा
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. ख्रिश्चन मिशेल आणि गुइडो हाश्के यांनी भारतात तब्बल ४३२ कोटी रुपये लाच म्हणून दिले असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात लाच घेणाऱ्या भारतीयांना अटक होण्याची शक्यता आहे.