ऑटोनगरातील गोडावूनमधून लाखोंचे एलईडी टीव्ही लांबविले

0
दोन महिन्यात तिसर्‍यांदा चोरी
2 लाख 72 हजारांचे एलईडी लंपास 
चोरटा सीसीटीव्हीत कैद
जळगाव- शहरातील ऑटोनगरमधील गोडावूनमधून तिसर्‍यांदा चोरी करुन चोरट्याने आतापर्यंत 2 लाख 72 हजारांचे किमतीचे एलईडी टीव्ही लांबवून नेल्याची घटना समोर आली आहे. आहे. एका घटनेत चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील ऑटोनगरात विक्रांत इंडस्ट्रीज येथे वासुदेव जगन्नाथ अग्रवाल (वय 38 रा. मालेगाव जि.नाशिक) यांचे गोडावून आहे. सदर गोडावूनमध्ये विविध कंपन्यांचे महागडे टीव्ही ठेवले आहेत. वासुदेव अग्रवाल हे 15 दिवस जळगावात तर 15 मालेगावात राहतात. गोडावूनवर समाधान सपकाळे म्हणून कर्मचारी कामाला आहे. रोज सकाळी कामानिमित्ताने 10 वाजता गोडावून उघडतात व रात्री 8 वाजता बंद करतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गोडावून उघडण्यासाठी आलेल्या सपकाळे यांना गोडावूनचे शटर उघडे दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहणी केली असता चोरीची खात्री झाली. त्यांनी याबाबत मालक वासुदेव अग्रवाल यांना प्रकार कळविला. त्यांनी घटनास्थळ गाठले व याबाबत पोलिसांना माहिती दिली.
दोन महिन्यात तिसर्‍यांदा चोरी
या गोडावूनमध्ये सुरुवातीला 18 नोव्हेंबर रोजी चोरी करुन चोरट्याने 45 हजाराचे टीव्ही लांबविले. यानंतर याच महिन्यात 27 नोव्हेंबर रोजी चोरट्याने 95 हजाराचे एलईडी लांबविले होते. यावेळी वासुदेव अग्रवाल यांनी खबरदारी घेतल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा शिरतांना कैद झाला होता. चोरटा ज्या मार्गाने शिरला होता. दुकानातील हवा बाहेर जाण्याच्या खिडक्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. यानंतरही चोरट्याने  14 जानेवारी रोजी 1 लाख 32 हजारांचे एलईडी लांबविले. यात चोरट सीसीटीव्हीत कैद झाला असल्याची माहिती वासुदेव अग्रवाल यांनी दिली. आज अखेर अग्रवाल यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.