पिंपरी-चिंचवड : शहरवासीयांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शहरात स्वच्छता असणे गरजेचे आहे. शहरात प्रत्येक किलोमीटरवर ऑटोमॅटिक टॉयलेट बसविण्यात यावेत. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. निगडी बस स्टॉप येथे सॅमटेक क्लीन अॅण्ड क्लिअर कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून प्रथमच बसविण्यात आलेल्या ऑटोमॅटिक टॉयलेटचे उद्घाटन सोमवारी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडर अंजली भागवत, सॅमटेक क्लीन अॅण्ड क्लिअर कंपनीचे संचालक शोबित गुप्ता, अमित बाली, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेविका आशा धायगुडे-शेडगे, शर्मिला बाबर, अश्विनी बोबडे, अनुराधा गोरखे, चंदा लोखंडे, कमल घोलप, सुमन पवळे, नगरसेवक उत्तम केंदळे, तुषार कामठे, सह आयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर उपस्थित होते.
विविध सुविधा मिळणार
सॅमटेक क्लिन अॅण्ड केअर प्रा. लि. कंपनीने स्वखर्चाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाहिरातच्या माध्यमातून निगडी येथे उभारण्यात आलेल्या टॉयलेटचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च पुढील सात वर्षे कंपनी करणार आहे. त्या करिता जागा, पाणी, वीज व सांडपाण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे धोरण महापालिकेने मंजूर केले आहे. ऑटोमॅटिक टॉयलेट स्टेनलेस स्टीलचे असून त्यामध्ये वॉश बेसिन, अॅल्युमिनियम फ्लोरींग, ऑटो क्लिनिंग, टॉयलेट सीट, इनबिल्ट वॉटर टँक, सेन्सर फॉर इलेक्ट्रिसिटी कन्झरवेशन, जीपीआरएस लोकेशन/हेल्थ मॉनिटरींग, महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन मशीन अशा सुविधा उपलब्ध आहेत.