भुसावळ- ‘दिवसेंदिवस वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. इतर क्षेत्राप्रमाणे ऑटोमेशन आणि टेलिकॉम तंत्रज्ञानाचा वापर वाहतूक व्यवस्थापनात केला, तर अपघातांचे प्रमाण घटेल. शिवाय वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता येईल आणि वाहतूक कोंडी सुटेल,’ असे मत नाशिक येथील कॅट इंडिया ऑटोमॅशनच्या तंत्रज्ञान व्यवस्थापिका पुनम मतसागर यांनी येथे व्यक्त केले. शहरातील श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी भुसावळच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘इंडस्ट्रीयल ऑटोमेशन अँड फ्युचर ऑफ टेलिकॉम’वर कार्यशाळा झाला. याप्रसंगी मतसागर बोलत होते.
ऑटोमेशन तंत्रज्ञानाची व्याप्ती समजण्याची गरज
पुनम मतसागर म्हणाल्या की, ‘ऑटोमेशनमुळे अवजड कामे करणे सोईचे होते. त्यामुळे मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च याची बचत होते. शहरे स्मार्ट होताहेत. लोकांचे आयुष्य सुकर होत आहे. त्यामुळे ऑटोमेशन तंत्रज्ञानाची व्याप्ती आपण समजून घेतली पाहिजे.’ ऋतिका अभंग म्हणाल्या, ‘रस्त्यावरील दिव्यांचे ऑटोमेशन करता येणे शक्य आहे. हे दिवे फक्त अंधार असेल तोपर्यंत सुरू राहतील व सूर्यप्रकाश असेल तेव्हा आपोआप बंद होतील. त्यामुळे विजेची फार मोठी बचत होईल. शासनाच्या विविध जनकल्याणाच्या स्कीम आहेत. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास आणि रोजगार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जात आहेत, विद्यार्थ्यांची गेल्या 20 वर्षांपासून यशस्वी वाटचाल सुरू आहे अशी माहिती विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुलकर्णी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी ऑटोमॅशनच्या तंत्रज्ञान व्यवस्थापिका पुनम मतसागर, सहव्यवस्थापिका ऋतिका अभंग यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.सुलभा शिंदे, प्रा.धिरज पाटील, प्रा.स्मिता चौधरी, विजय विसपुते, रोहित निर्मल उपस्थित होते.