जळगाव : शहरातील गवळीवाडा भागातील एकाची 30 हजार रुपये किंमतीची रीक्षा चोरून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली.
तिघे संशयीत जाळ्यात
आकाश भास्कर वाघ (22, गौतम नगर, तांबापुरा) हे रीक्षा चालक असून आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 12 एप्रिल रोजी त्यांनी रात्री 10 वाजता त्यांची मालकीची रीक्षा (एम.एच.19 व्ही.6622) घरासमोर पार्क केली होती. बुधवार, 13 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास रीजवान शेख गयासोद्दीन शेख, रवी प्रकाश चव्हाण, आवेश जावीद शहर (सर्व रा.बिस्मिल्ला चौक, तांबापूरा, जळगाव) यांनी घरासमोरील रीक्षा चोरून घेवून जात असतांना आढळून आले. दरम्यान, आकाशच्या लक्षात ही बाब आल्याने तिघांनी रीक्षा सोडून पळ काढला. आकाश वाघ याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर बुधवार, 13 एप्रिल रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रीजवान शेख गयासोद्दीन शेख, रवी प्रकाश चव्हाण, आवेश जावीद शहर (सर्व रा.बिस्मिला चौक, तांबापूरा, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार नितीन पाटील करीत आहे.