ऑटो रॅलीचे झाली

0

ठाणे – बँक ऑफ बडोदाने 110 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला रिक्षा चालकांच्या ऑटो रॅलीचे आयोजन केले होते. त्या निमिताने बँकेने 25 महिला रिक्षा चालकांना ऑटो रिक्षासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक नवे पाऊल उचलले. हया कार्यक्रमाप्रसंगी ठाणे मनपाच्या नगरसेविका नंदिनी राजन विचारे, बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक नवतेज सिंग, मुंबई पूर्व क्षेत्र प्रमुख एच.टी. सोलंकी तसेच बँकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.