ऑट्टर्स क्लब अंतिम फेरीत

0

मुंबई । ऑट्टर्स कल्बच्या ऑट्टर्स रॉकेट संघाने विजयी आगेकूच कायम राखताना खार जिमखान्याच्या के.जी. पॉकेट रॉकेट्स संघाचा 3-0 असा पराभव करत ऑट्टर्स क्लब मुंबई स्नुकर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. निर्णायक फेरीत ऑट्टर्स रॉकेट संघाचा सामना एलफिस्टन क्रिकेट क्लबच्या एल्फिज हार्नेटस संघाशी होईल. दुसर्‍या उपांत्य फेरीत एल्फीज हार्नेट्स संघाने खार जिमखान्याच्या के जी डर्टी हाफ डझन संघाचा पराभव केला होता.

उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत अभिमन्यू गांधीने रोहन सहानीचा 93-58 असा पराभव करत ऑट्टर्स क्लबला खाते खोलून दिले. दुसर्‍या लढतीत झेनुल अर्सीवाला आणि युधीष्टीर जयसिंग या जोडीने सागर कंजानी आणि आकाश असरानी या जोडीवर 79-35 असा विजय मिळवत संघाची आघाडि 2-0 अशी वाढवली. तिसर्‍या लढतीत रिषभ ठक्कर सुमेर मागोचा 102-72 असा पराभव करत संघाच्या निर्भेळ यशावर शिक्कामोर्तब केले. रिषभ ठक्करला या लढतीचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.