ऑट्टर्स क्लब बिलियर्डस लीगमध्ये 60 संघाचा सहभाग

0

मुंबई । दोन वेळा स्नूकरचे आशियाई विजेतेपद मिळवणारा यासीन मर्चंट, देवेंद्र जोशी, सिद्धार्थ पारिख, इशप्रीतसिंग चढ्ढा, विशाल मंडन, मानव पांचाळ, महेश जगदाळे, रिषभकुमार, रिषभ ठक्कर, सारंग श्रॉफ, फैसल खान, राहुल सचदेव आणि मुकूंद भराडीया या प्रमुख खेळाडूंसह सुमारे 60 संघाचा सहभाग हे ऑट्टर्स क्लब आयोजित बिलीयर्ड लीग स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले आहे.

सोमवारपासून सुरु झालेल्या 60 संघाची प्रत्येक गटात चार याप्रमाणे 15 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेतील पहिली फेरी 16 जुलैपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर 17 जुलैपासून दुसर्‍या फेरीतील लढतींना सुरुवात होईल. तिसर्‍या फेरीतील होम आणि अवे सामने 24 ते 30 जुलै दरम्यान खेळवण्यात येतील. स्पर्धेची अंतिम लढत 20 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. स्पर्धेदरम्यान सुमारे दोन लाख रुपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला 75 हजार आणि उप विजेत्या संघाला 45 हजार रुपयांचा रोख पुरस्कार मिळेल.