फैजपूर शहरातील तरुणाचा असाही प्रामाणिकपणा
फैजपूर- शहरातील एका तरुणाच्या आयसीसी बँकेच्या खात्यात अनावधानाने जमा झालेली तब्बल 23 हजाराची रक्कम संबंधित ग्राहकास परत करून त्या तरुणाने आजही प्रामाणिकपणा जिवतं असल्याचे दाखवून दिले आहे. रमेश दामू कोळी असे रक्कम परत करणार्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी कोचूर, ता.रावेर येथील पुंडलिक महाजन यांना 23 हजारांची पूर्ण रक्कम परत केली. तुषार महाजन यांना ऑनलाइन स्टेट बँकेच्या आपल्या खात्यातून त्यांच्या संबंधितांना 23 हजार रुपये वर्ग करायचे होते मात्र अनावधानाने एखादा चुकीचा नंबरने दाबला गेल्याने ती रक्कम फैजपूर येथील रमेश कोळी यांच्या खात्यात जमा झाली. महाजन यांनी तातडीने चौकशी केली असता रमेश कोळी यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती मिळाली व रमेश कोळी यांना सुद्धा खात्यात 23 हजार जमा झाल्याचा संदेश आला होता. दरम्यान कोळी व महाजन या दोघांमध्ये संवाद झाल्यावर त्यांनी तुषार महाजन यांना फैजपूरला बोलावून घेत 23 हजारांची पूर्ण रक्कम परत करत आजही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले तर महाजन यांनी सुद्धा कोळी यांचे आभार मानले.