ऑनलाइन च्या माध्यमातून महिलेला 36 हजारांचा गंडा

0

कल्याण : कल्याण पश्चिमकडील आधारवाडी जेल रोड वरील लुल्ला कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी 56 वर्षीय वर्षीय महिलेच्या क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तब्बल 32 हजार 625 रुपयांची ऑनलाइन ने खरेदी केली. सदर बाब निदर्शनास येताच या महिलेने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.