कल्याण । डेबिट कार्डाची माहिती घेत ऑनलाईनच्या माध्यमातून आजमितीला शेकडो नागरिकांच्या बँक खात्यातून शेकडो नागरिकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास करण्याचे प्रकार काही महिन्यापासून सुरु असून हे वाढते प्रकार पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहेत. तर नागरिक मात्र धास्तावले आहेत. बँकाकडून पोलीस यंत्रणाकडून कुणालाही बँक खात्याची डेबिट कार्डची माहिती देवू नका असे आवाहन केले जात आहे. अशीच एक घटना कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात गोदरेज पार्कमध्ये राहणार्या अरुण खैरनार यांच्यासोबत घडली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा
शुक्रवारी दुपारच्या सुमरास खैरनार यांच्या मोबाईलवर फोन आला फोनवर बोलणार्या इसमाने मी बँकेतून बोलत असून तुमचे कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे असे सांगत बोलण्यात भुलवून खैरनार यांच्याकडून बँक खात्यासह डेबिट कार्डची माहिती मिळवली. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून तब्बल 9 लाख 32 हजार 212 रुपये लंपास केले. सदर बाब निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.