ऑनलाईनच्या माध्यमातून गाय विक्रीचे आमिष दाखवून ६० हजारांचा घातला गंडा

0

कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शिळ रोड पलावा सिटी येथे राहणारे बापू दवडे यांनी ३१ जुलाई रोजी गिर या जातीचे देशी गाय खरेडी करण्यासाठी इंटरनेटच्या आधारे शोध घेत होते त्यावेळी त्यांनी इंडिया मार्ट या वेबसाईट वर सर्च केले यावेळी त्यांना एका इसामचा फोन आला .

सुनील अंजनकर असे नाव सांगून त्यांना हिर जातीची देशी गाय उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच त्यानंतर एका हीना कुमार नावाच्या महिलेने त्यांना फोनवर संपर्क साधत हि गाय उपलब्द आहे पान काही पैसे आधी द्यावे लागतील असे सांगितले या आमिशाला बळी पडत दवडे यांनी त्यांना ६० हजार रुपये देवू केला मात्र त्यानंतर आजमितीला त्यांनी गाय न दिल्याने दवडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .या प्रकरणी दवडे या यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सुनील अंजनकर व हीना कुमार विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे