ऑनलाईन अर्जासाठी शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवा

0

चाळीसगाव। शेतकर्‍यांना तात्काळ कर्जमाफी देवुन ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शिथील करुन सोप्या पद्धतीने अर्ज भरुन घ्यावे, त्यासाठी गणनिहाय केंद्र सुरु करुन शेतकर्‍यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे सहाय्यक निबंधक चाळीसगाव यांच्याकडे 27 जुलै 2017 रोजी करण्यात आली आहे. राज्यात एकूण 1 लाख 36 हजार शेतकरी आहे, म्हणजेच शासनाकडे शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती व यादी असतांना देखील शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरायला लावणे म्हणजेच एक प्रकारे शेतकर्‍यांची थट्टाच आहे. तरी शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया शिथिल करून शेतकर्‍यांकडून सोप्या पद्धतीने अर्ज भरून शेतकर्‍यांना कर्ज माफीचा लाभ द्यावा अशीही मागणी यावेळी निवेदनात म्हटले आहे.

शेतातील कामे सोडून अर्जासाठी रांगेत
ऐण शेती कामाच्या वेळेस शेतकरी हा शेतीकामात व्यस्त असतांना शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्याची अट टाकून एक प्रकारे शेतकर्‍यांना त्यांच्या कामापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. शेतकरी आपले काम धंदे सोडून अर्ज भरण्यासाठी शासनाने दिलेल्या ऑनलाईन केंद्रावर जातात व त्याठिकाणी बर्‍याचदा सर्वर बंद असल्यामुळे शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. शेतीकामाच्या मोसमात शेतकर्‍यांची फिरफिर थांबवावी व शेतकर्‍यांची आर्थिक व वेळेचे नुकसान होऊ नये तसेच चाळीसगाव तालुक्यात गण निहाय (पंचायत समिती) अर्ज भरण्याचे केंद्र सुरु करावेत. त्यामुळे शेतकर्‍यांची होणारी धावपळ थांबेल. लवकरात लवकर हि प्रक्रिया सुरु करावी. असे न झाल्यास रयत सेना तीव्र आंदोलन छेडेल होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेस शासन प्रशासन जबाबदार राहील, असा ईशारा देण्यात आला आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरळीत करावी
रयत सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने नुकतीच कर्ज माफीची घोषणा केली त्यात 2009 ते 30 जून 2016 अखेर ज्या शेतकर्‍यांकडे थकबाकी होती, त्यांनी थकबाकी भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे जाचक निकष लावून शेतकर्‍यांनी त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत असे शासनाचे आदेश आहेत, त्यानुसार शेतकरी ऑनलाईन अर्जसाठी शासनाचे अधिकृत ई-सेवा केंद्रे वाघळी, पिलखोड, तमगव्हाण व सायगाव हे दिले आहेत. या ठिकाणी शेतकरी अर्ज भरण्यासाठी जात आहेत मात्र चाळीसगाव तालुक्यात फक्त चार केंद्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिली असून त्या ठिकाणी सर्वर नेहमी बंद असतात.

निवेदन देतांना यांची उपस्थिती
राज्यात एकूण 1 लाख 36 हजार शेतकरी आहे, म्हणजेच शासनाकडे शेतकर्‍यांची संपूर्ण माहिती व यादी असतांना देखील शेतकर्‍यांना ऑनलाईन अर्ज भरायला लावले जात आहे. मुखमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री यांना पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्हे .सूर्यकांत कदम, अनिल कोल्हे, संघटक पप्पु पाटील, शहराध्यक्ष दत्तु पवार, विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष सप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष मयूर चौधरी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, समाधान मांडोळे, विलास मराठे, शहर उपाध्यक्ष योगेश पाटील प्रसिद्धी प्रमुख गणेश देशमुख, अमोल पाटील, गणेश पवार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.