जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
इंग्लड येथील कंपनीच्या नावाने बोगस बॅँक खाते तयार करून जळगाव येथील व्यावसायिकास ऑनलाईन ४१ लाख २८ हजार ४४८ रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी गुरूवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
एमआयडीसीतील एच १८ येथे मे. स्टार कुलर्स अँड कंडेन्सर्स ही कंपनी कार्यरत असून तिचा इंग्लड येथील स्टार फ्रॉस्ट लि. या कंपनीशी करार झाला आहे. त्यानुसार इंग्लडची कंपनी यंत्र बनविण्यात तांत्रिक डिझायन इत्यादी तज्ञांमार्फत सेवा देते. त्या बदल्यात स्टार कुलर्स कंपनीकडून कंपनीच्या ईमेल पत्यावरील बॅँक खात्यावर ऑनलाईन आर्थिक व्यवहार होतो. यात संबंधीत कंपनीची फसवणूक झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.