पिंपरी-चिंचवड : ऑनलाइन खरेदी-विक्री करणार्या क्विकर वेबसाईटवरून विविध प्रजातीच्या कुत्र्यांची विक्री करणार्या जाहिराती अपलोड करून नागरिकांकडून पैसे उकळणार्या राजन जनार्धन शर्मा या तरुणास पुणे सायबरसेलकडून अटक करण्यात आली. आज या तरुणाचा आणखी एक ’प्रताप’ उघडकीस आला असून त्याने लोकॅन्टो या संकेतस्थळावर या जातीच्या श्वानाची (कुत्रा) विक्रीची जाहिरात देऊन एका महिलेची दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडीत उघडकीस आला. हा प्रकार 22 नोव्हेंबर 2017 रोजी घडला.
दहा हजारला गंडा
याप्रकरणी राजन जनार्धन शर्मा (रा. गोवा) याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभ्रा रस्तोगी (वय 35, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रा रस्तोगी यांना श्वान विकत घ्यायचा होता. लोकॅन्टो या संकेतस्थळावर डहळह र्ढूी र्िीि या जातीच्या श्वानाची (कुत्रा) विक्रीची जाहिरात आरोपी राजन याने दिली होती. ही जाहिरात पाहून शुभ्रा यांनी राजन यांच्याशी संपर्क साधला. डहळह र्ढूी र्िीि या जातीच्या श्वानसाठी आरोपीने शुभ्रा यांना यांना दहा हजार रूपये ऑनलाईन भरण्यास सांगितले.
कोंढवा ठाण्यात गुन्हा दाखल
पैसे देऊन अनेक दिवस उलटले तरी डहळह र्ढूी र्िीि या जातीच्या श्वानाचे पिल्लू आले नाही. त्यामुळे त्यांनी आरोपी राजन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुभ्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजन शर्मा याच्यावर अशीच फसवणुक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोंढवा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यात येणार असल्याचे, हिंजवडी पोलिसांनी सांगितले.