जळगाव : हल्ली सायबर चोरट्यांनी ऑनलाईन फसवणुकीचा नवीन ट्रेंड सुरू केला असून या माध्यमातून जळगावातील दोघांना सुमारे 60 हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
गिप्टच्या आमिषाने लिंक क्लिक करताच 26 हजारात फसवणूक
राहुल प्रमोद महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवार, 30 एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्याचे वडील प्रमोद महाजन हे घरी असतांना त्यांना मोबाईलवर 295372385 या क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन उचलल्यावर प्रमोद महाजन यांना समोरील व्यक्तीने तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे, तुला लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक करून तुला गिफ्ट मिळेल, असे सांगितले. प्रमोद महाजन यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेच्या खात्यातून 26 हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने दुसर्या खात्यात वळते झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत शनिपेठ पोलिस स्थानकात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहेत.
लिंकला क्लिक करताच रक्कम कपात
दुसर्या घटनेत लक्ष्मी निलेश राखोंडे या शनिवार, 30 एप्रिल रोजी दोन वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांना 7093698739 या क्रमांकावरून फोन आला. फोन उचल्यावर त्यांना समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमचे लक्ष्मी किराणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गिप्ट मिळाले आहे. राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांची कोटक महेंद्रा कंपनीच्या विजा कार्ड व खात्यातून 37 हजार 495 रुपये ऑनलाईन पध्दतीने ही रक्कम ट्रान्सपर करून घेत संबंधित फोनवर बोलणार्याने ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी देखील शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहेत.