ऑनलाईन मिळणाऱ्या गर्भापाताच्या किटवर प्रतिबंध कसा आणणार?

0

मुंबई – गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या कीट या ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहेत. ऑनलाईनवर गर्भपाताच्या कीट मिळत असल्यामुळे गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऑनलाईन मिळणाऱ्या गर्भपाताच्या किटवर सरकार काय प्रतिबंधात्मक उपाय करणार आहे असा प्रश्न भाजपाच्या आमदार भारती लव्हेकर यांनी उपस्थित केला होता. एका महिला आमदारांने उपस्थित केलेल्या या गंभीर प्रश्नाला सभागृहात काहीही उत्तर न देता या प्रश्नाला बगल देण्यात आली.

राज्यातील मुलींचे प्रमाण कमी होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अॅड भीमराव धोंडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.या प्रश्नाला आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी उत्तर दिले. यावेळी सांगताना राज्यात गर्भपात होऊ नये साठी राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनाची माहिती सभागृहात दिली. आत्तापर्य़ंत गर्भलिंग निदान करणाऱ्या ७१ डॉक्टरांची सनद रद्द करण्यात आली आहे. तसेच ४१६ संशयित सोनोग्राफी सेंटर असून या सेंटरवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. ५८० कोर्ट केस चालविल्या जात असल्याची माहिती दिली