चिपळूण : येथील महर्षि कर्वे भाजी मंडई इमारतीतील 54 व्यापारी गाळ्यांसाठी राबवलेल्या ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत अकराजणांनी सहभाग घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजी व्यापार्यांनी याविषयी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र येत्या काही दिवसांत उर्वरित गाळ्यांसाठी फेरलिलाव नगर परिषद राबवण्याची शक्यता आहे.
लिलावाची निविदा जाहीर होताच व्यापार्यांनी त्यावर आक्षेप घेऊन या चुकीच्या इमारतीत बदल करण्याची मागणी केली. दर्शनी भागातील दोन गाळ्यांची भिंत तोडून तेथून प्रवेशद्वार देण्याची मागणी व्यापार्यांनी केली आहे. इमारतीत अन्य काही बदल सुचवले आहेत. जोपर्यंत हे बदल घडत नाहीत, तोपर्यंत भाजी मंडईत पाऊल टाकणार नाही, असा इशारा भाजी व्यापारी संघटनेने दिला आहे.