ऑनलाईन विवरणपत्रास शेवटची मुदत

0

जळगाव। सर्वनोंदणीकृत सार्वजनिक खाजगी आस्थापनांनी विवरणपत्र आर-1 ऑनलाईन द्वारे 30 जुलैपर्यंत भरणे बंधनकारक आहे. विवरणपत्र विहित मुदतीत भरल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाच्या सहाय्यक संचालक अनिसा तडवी यांनी दिली आहे.

सेवा योजना कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा, 1959 मधील तरतूदीनुसार आस्थापनांवर कार्यरत असणार्‍या सर्व कर्मचार्‍यांची माहिती प्रत्येक तिमाही अखेर सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार 30 जुनची माहिती पुढील 30 दिवसाच्या आत ऑनलाइन पध्दतीने विवरणपत्र आर-1 भरणे बंधनकारक आहे. तिमाही विवरणपत्र एकात्मिक वेब पोर्टल महास्वयम् संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येणार आहे.