ऑनलाईन वेश्या व्यवसायाला आळा घालण्यासह देशातील चर्चसह मिशनरी संस्थांची व्हावी चौकशी

0

यावलला हिंदू जनजागृती समिती व राष्ट्रीय हिंदू आंदोलनच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन

यावल- रेल्वे मंत्रालयाने कुंभ मेळ्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी रेल्वे टिकीटात लावलेला अधिभार त्वरीत रद्द करावा, ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणार्‍या संकेत स्थळावर बंदी आणावी, देशात विविध चर्चमध्ये उघडकीस आलेल्या लैगिंक शोषण व लैगिंक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच चर्चची चौकशी करावी, राज्य सरकारने मुस्लिमांसाठी बक्षीसपात्र मालमत्तेचा नोंदणी न करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, देशभरातील चर्च व मिशनरी संस्थांची चौकशी करण्याची मागणी, आबीद पाशा व त्यांच्या टोळीवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक ढीलाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच संबधीत टोळीवर मोक्काव्दारे कारवाई करण्याची मागणीसोमवारी हिंदू जनजागृती समिती व राष्ट्रीय हिंदू आंदोलनच्या वतीने तहसील प्रशासनाकडे करण्यात आली. निवासी नायब तहसीलदार आर.बी.माळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेसमयी लखन नाथ, राहुल भालेराव, अप्पा अरूण माने, राहुल कोळी, गोकुळ कोळी, लालचंद चौधरी, सागर कोळी, कृष्णा वराडे, सागर निवृत्ती कोळी यांची उपस्थिती होती.