ऑपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांना यश

0

सोयगाव । बालकामगारांना शोधण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत ऑपरेशन मुस्कान सुरु करण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत फर्दापूर पोलिसांनी गुरुवार 20 रोजी फर्दापूर येथे कारवाई करुन परीसरातील हॉटेल्स , गॅरेज आदी ठीकाणी काम करणार्‍या बालकामगारांना ताब्यात घेतले. बालकामगारांचे समोपदेशन करुन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीसांच्या या कारवाईचे नागरीकांमधुन कौतुक होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जर्‍हाड, साहाय्यक फौजदार पोपटराव कांबळे, पो.कॉ. राजु काकडे, संदीप सुसर, बाजीराव धनवट यांचे पथक गावात पेट्रोलींग करत असतांना मोठ्या प्रमाणात बालकामगार काम करीत असल्याचे त्यांना दिसुन आले.

दरम्यान ऑपरेशन मुस्कान अंतर्गत साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जर्‍हाड यांच्या मार्गदर्शना वरुन फर्दापूर पोलिसांनी या बालकामगारांना ताब्यात घेतले.फर्दापूर पोलिस ठाण्यात या बालकामगारांचे समोपदेशन करुन या बालकामगारांना व त्यांच्या पालकांना साहाय्यक पोलिस निरीक्षक शरद जर्‍हाड यांनी शिक्षणाचे महत्व पटवुन दिले व बालकामगारांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सामाजिक बांधीलकी जपत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत केलेल्या या कारवाई मुळे फर्दापूर परीसरात पोलिसांच्या या कारवाई चे कौतुक होतांना दिसत आहे.