ऑफ स्पिनर्सला मी गोलंदाज समजत नाही-सेहवाग

0

लंडन । भारतीय ऑफ स्पिनर्स आर.अश्‍विन याने आपल्या जुन्या आठवणींना उजाळ देत सांगितले की, सेहवागला नेट मध्ये सराव करित असतांना त्याला मी गोलंदाजी करित होतो. सेहवागला माझी गोलंदाजी खेळतांना कोणत्याच अडचणी येत नव्हत्या. सेहवागची फलंदाजी इतकी उत्कृष्ट कशी काय, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी सेहवागजवळ गेलो आणि मी नेमक्या काय सुधारणा करायला हव्यात, असा प्रश्न सेहवागलाच विचारला,’ असे अश्विनने सांगितले.

त्यावेळी ‘ऑफ स्पिनर्सला मी बॉलर्सच समजत नाही. ऑफ स्पिनर्सची गोलंदाजी खेळताना मला अजिबात त्रास होत नाही. मी त्यांची गोलंदाजी अगदी आरामात खेळतो,’ असे उत्तर सेहवागने दिले होते, अशी आठवण एका कार्यक्रमात दिलखुलासपणे केलेल्या वार्तालापत अश्विनने सांगितली.

‘दम्बुलामध्ये आम्ही नेटमध्ये सराव करत होतो. त्यावेळी मी टाकलेला एकही चेंडू सेहवागसाठी अडचणीचा ठरला नव्हता. मी पहिला चेंडू ऑफ स्टम्पच्याबाहेर टाकला होता. तो चेंडू सेहवागने कट केला. त्यानंतर मी ऑफ स्टम्पवर मारा केला. तो चेंडूदेखील सेहवागने अगदी आरामात कट केला. यानंतर मी मिडल स्टम्पवर टाकला, तो चेंडूदेखील सेहवागने कोणत्याही अडचणविना कट केला. मग मी लेग स्टम्पवर चेंडू टाकला. सेहवागने तो चेंडूदेखील कट केला. त्यामुळे नक्की काय चालले आहे, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मग मी फुल लेंथचा चेंडू टाकला. यानंतर सेहवागने दोन पावले पुढे टाकत थेट षटकार ठोकला,’ असा अनुभव अश्विनने सांगितला.सेहवागसमोर नेमक्या कोणत्या पद्धतीचे चेंडू टाकायचे, असा प्रश्न अश्विनला त्यावेळी पडला होता. त्यावेळी अश्विन भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता. त्यामुळे सेहवागच्या फटकेबाजीचा अश्विनने चांगलाच धसका घेतला. ‘एक तर माझी गोलंदाजी फारशी चांगली नाही किंवा मग सेहवागची फलंदाजी फारच चांगली आहे, असे त्यावेळी मी मनातल्या मनात म्हटले आणि सेहवाग खरोखरच अत्यंत चांगला फलंदाज आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरसमोर गोलंदाजी करताना मला फारशा अडचणी आल्या नाहीत. मात्र सेहवागसमोर गोलंदाजी करताना माझी तारांबळ उडायची. त्यामुळेच मी सेहवागच्या फलंदाजीचे काही दिवस निरीक्षण केले’, असा किस्सा अश्विनने सांगितला.