भुसावळ । अंबाझरी येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत रविवार, 10 रोजी औद्योगिक कर्मचार्यांची भरती करण्यासंदर्भात लेखी परीक्षा होणार आहे. काही दलालांनी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने काही उमेदवारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालवला असून अशा लोकांपासून सावधान राहण्याचे आवाहन भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक रणजीतसिंह ठाकुर यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
परीक्षा अत्यंत पारदर्शी वातावरणात होणार असून कुठल्याही दलालांपासून वा नोकरी लावून देतो म्हणून रक्कम द्या, असे सांगणार्यांपासून सावधान राहावे, असे आवाहन करण्यात आले असून यासंदर्भात काही सुचना वा माहिती असल्यास महाप्रबंधक वा भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील सतर्कता अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.