ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट

0

पुणे । खडकी येथील ऑर्डिनेन्स फॅक्टरीत गुरुवारी सकाळी दारुगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात 2 कर्मचारी जागेवरच ठार झाल्याची माहिती आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ऑर्डिनेन्स फॅक्टरीमध्ये गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की दोन कर्मचार्‍यांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

आधिक तपास पोलीस करत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सकाळी कामगार काम करत असताना साडे नऊच्या सुमारास दोन स्फोटक वस्तू हाताळताना ही घटना घडली. ही वस्तू एका जागेवरून दुसर्‍या जागेवर घेऊन जात असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्यात दोन जणाचा जागीच मृत्यू झाला तसेच दोन जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात आधिक तपास पोलीस करत आहेत.