वरणगाव । ऑर्डनन्स फॅक्टरी प्राथमिक शाळा वरणगाव सुवर्ण जयंती महोत्सव व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा अतिशय उत्साहात व जल्लोषात ज्युनिअर क्लबमधये पार पडला 7 जानेवारीला शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बी.सी.पाटील तसेच अप्पर महाप्रबंधक एच.आर.दिक्षित, स्कूल चेअरमन शरद राव, मुख्याध्यापिका एस. के. पाटील, स्कूल डिओ डॉ.प्रमोद कुमार, उद्योजक हरीश यादव, इतर माजी शिक्षकवृंद, सध्या स्थित शिक्षकवृंद व सर्व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष बी.सी.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा 13 जून 1966 साली त्यांनी स्वतः व त्यांच्या पत्नी एस.बी.पाटील यांनी उघडले असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा कार्यक्रम झाल्याचे ते म्हणाले. आयोजकांचे कौतुक करुन त्यांना उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी शिक्षक डि.व्ही.कुळकर्णी, सोनवणे व माजी विद्यार्थी तुषार साळुंखे, डॉ. उमेश गडपाल, धुरंधर, पाटील व इतर विद्यार्थ्यांचे व इतर मान्यवरांचे भाषणे झालीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी शिक्षकांचा मानपत्र व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले सर्वप्रथम रजिस्ट्रेशन जयंत चौधरी, स्वाती हिरवे, फॅमिली रजिस्टे्रशन निंबाळकर, गडपाल, कुंडले व मॅन अॅड मायलेज राजेश देशपांडे, उत्तम सहकार्य, पौर्णिमा शेट्टी, याखेरीज करमणुकीच्या कार्यक्रमात, समाधान पवार, बाळकृष्ण सूर्यवंशी, कैलास सोनवणे, सुनिल साळी, प्रमोदिनी निंबाळकर, ज्योत्स्ना ठाकरे, शमा मेलाग यांनी गाणे गायले.
यांनी घेतले परीश्रम
या कार्यक्रमासाठी प्रमोद माळी, प्रदिप नेवे, नितीन मकासरे, सुनिल सुतार, सुनिल वाणी, तुषार साळुंखे, सुनिल महाजन, जयंत चौधरी, अतुल शेटे, निता पाटील वायकोळे, ललिता भंगाळे, अल्का वानखेडे, माधुरी फेगडे, धीरज निकुंभ, संजय भालेराव, मनिषा मोरडे, शशिकांत रोडेकर, शिवरामे आदिंनी परीश्रम घेतले. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकसंघत्व व बंधुभाव असणे आवश्यक असते ते याठिकाणी निदर्शनास आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रमोद माळी व आभार प्रदर्शन सुनिल महाजन यांनी मानले.