ऑलिम्पिकचे मेडल्स ई-कचर्‍यापासून बनणार !

0

जपान ।  ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणे हे दिव्य असतो. तसेच त्यादेशासाठी ते एक आव्हानही असते. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिकण्याचे जगातील प्रत्ये खेळाडूचे स्वप्न असते. 2020 साली जपानच्या टोकियोमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अ‍ॅथलिट्सने आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळालेल्या जपानने ऑलिम्पिक स्पर्धेचे मेडल्स तयार करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. टेक्नोलॉजीच्या विश्वात भराभर प्रगती करत असलेल्या जपानने ऑलिम्पिक स्पर्धेसाठीचे मेडल्स पुनर्प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक उपकरांपासून तयार करण्याचा निश्चय केला आहे.