ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित

टोकियो : भारताची युवा बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच लवलीना हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत प्रवेशाने लवलीनाचे कांस्यपदक निश्चित झाले असले तरी आता उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतींमधून चांगली कामगिरी करत पदकाचा रंग बदलण्याची संधी तिच्याकडे असेल.

लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते