ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अधिवेशन

0

जळगाव । देशभरात सोनार समाजाचे सुमारे एक कोटी समाज बांधव असून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समाजाने एकदिलाने पुढे येऊन विशेष प्रयत्न करून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवावे असा सूर आज जळगाव येथे आयोजित सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनात मान्यवरांनी काढला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर, राष्ट्रीय महासचिव डॉ. देवेंद्र शेरेकर, जिल्हाध्यक्ष किरण पातोंडेकर, धनाजीबाबा सोनार,संदीप भामरे, सुभाष वेदपाठक, उपजिल्हाधिकाऱी राहुल मुंडके, विलास अनासने, दिलीप दाभाडे, नारायण शेरेकर, मायाताई होते, रेखाताई दुडके, पारस देवपूरकर ,नाना निकुंभ उपस्थित होते. मोहन हिवरकर यांनी सोनार समाजाची राष्ट्रीय जनगणना, वार्षिक महाअधिवेशन घेणे,नरहरी नॅशनल बँकेची स्थापना ,मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्मिती,सोनार आर्थिक महामंडळाची स्थापना बाबत प्रयत्न करीत असल्याचे मोहन हिवरकर यांनी सांगत समाजामध्ये असलेल्या उप जातींच्या भिंती तोडून एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी नारायण शेरेकर,नाना निकुंभ , रमेश बहुगुणे जिल्हाध्यक्ष किरण पातोंडेकर ,उपाध्यक्ष प्रमोद विसपुते,कोषाध्यक्ष योगेश भामरे,केतन सोनार,शहराध्यक्ष संजय भामरे ,शहर उपाध्यक्ष वैभव सराफ,मधुकर शूरपटणे,सोनाली कुलथे,लताताई मोरे ,प्रशांत सोनार ,लक्ष्मीकांत सोनार ,सचिन डहाळे,गणेश बाविस्कर,विजय वानखेडे,राजेंद्र बाविस्कर,अरुण पिंगळे,दिलीप सांगळे,राजेंद्र विसपुते ,आदींसह याप्रसंगी कलर्स वाहिनीवरील विजेता शिवम वानखेडे व आयएएस अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा यावेळी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.