ऑसी मिडियाला ‘बिंग बी’ म्हणाले ‘धन्यवाद’!

0

मुंबई । अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रध्यक्ष निवडणूकीत सर्व मिडीयाचे अंदाज खोटे ठरवून विजयी झाले होते. त्यांच्याशी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची तुलना ऑस्ट्रेलियन मीडियावर चहूबाजूंनी टीकेची भडिमार करण्यात येत आहे. बॉडिवूडचे बिंग बी हे मुद्यावरून ऑस्ट्रेलियन मीडियाचे धन्यवाद मानत विराटची पाठराखण केली आहे.’विराटला ’ट्रम्प’ संबोधून तो विजेता आहे हे मान्य केल्याबद्दल ऑसी मीडियाचे आभार!’ असा उपरोधिक टोला बिंग बी ने मारला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान सध्या कसोटी मालिका सुरू असून ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ व विराट यांच्यात डीआरएसच्या मुद्यावरून बरीच खडाजंगी झाली. स्मिथने काही वेळा डीआरएसची मागणी करताना ड्रेसिंग रूमकडे पाहिल्याचा आरोप विराटने केला होता. त्यावरून ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमे खवळली आणि त्यांनी विराटवर हल्ला चढवला. विराटने आमच्या खेळाडूंबद्दल खोट्या बातम्या पसरविल्या, पण बीसीसीआयच वा आयसीसीनेही त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, अशी कडवट टीका ‘द टेलिग्राफ’मधील एका लेखात करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच विराटने प्रसारमाध्यमांना दोषी धरत स्वतःचा चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला आहे, असे म्हणत त्याची तुलना ट्रम्प यांच्याशी केली होती.विराटवरील ऑसी मीडियाच्या या टीकेमुळे भारतीय क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. विराटच्या चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. बिंग बी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत विराटच्या बाजूने ट्विट केले आहे.