ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटर’ची मोहर

0

शशी कपूर, श्रीदेवीला श्रद्धांजली

लॉस अ‍ॅन्जलिस : हॉलिवूड विश्वातील सर्वाधिक मनाचा मानला जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाने मोहर उमटवली आहे. या चित्रपटला सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. त्या खालोखाल ‘मडबाऊंड’ला 5 विभागात तर ‘ग्रेट आऊ’ला 4 नामाकांने मिळाली आहेत. या शानदार सोहळ्यात बॉलिवूडचे अभिनेते शशी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्वोक्तृष्ट अभिनेता, अभिनेत्रीसाठीचे ऑस्कर पुरस्कार
जगप्रसिद्ध असलेला ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आणि यामध्ये 13 श्रेणींमध्ये नामांकित झालेल्या ’शेप ऑफ द वॉटर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 4 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दिग्दर्शक गिलियेरमो देल तोरो ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याशिवाय ’ओरिजिनल स्कोर’ आणि ’प्रोडक्शन डिझाइन’ अशा दोन श्रेणींमध्येदेखील या चित्रपटाने सिनेक्षेत्रातील सगळ्यात अधिक मानाचा पुरस्कार म्हणजेच ’ऑस्कर पुरस्कार’ पटकावला आहे. फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना ’थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ’द डार्केस्ट अवर’ चित्रपटातील भूमिकेसाठी गॅरी ओल्डमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. ’द शेप ऑफ वॉटर’साठी गिलर्मो डेल टोरो यांनी सर्वोत्तम दिग्दर्शनाची बाहुली पटकावली. लॉस अ‍ॅन्जलिसध्ये 90 वे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेता जिम्मी किमेल यांनी ऑस्करचे सूत्रसंचालन केले. बहुचर्चित डंकर्क चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन असे तीन ऑस्कर पटकावले.