ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भारताची मदार त्रिकूटावर

0

सिडनी : वर्षांतली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत भारताची मदार ही लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा या अनुभवी त्रिकुटावर असणार आहे. मार्टिना हिंगिसची साथ सोडल्यानंतर सानियाने बाबरेरा स्ट्रायकोव्हासह खेळताना विजेतेपद कायम राखले आहे. नव्या जोडीदारासह वर्षांची सुरुवात ग्रँड स्लॅम जेतेपदाने करत दुहेरीच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठण्याचा सानियाचा मानस आहे. सानियाला २०१६ वर्ष अविस्मरणीय ठरल्याचे सांगितले आहे. आता या वर्षी करियर ग्रँड स्लॅम जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे. महिला डबल्स व मिक्स डबल्सची तीन तीन ग्रँडस्लॅम जिंकली आहेत व त्यामुळेच २०१६ वर्ष फारच मस्त गेल्याचे तिचे म्हणणे आहे. भारतीय संघाला नव्या ताकतवर खेळाडूंची उणीव नेहमीच भासत आहे. चाळिशी ओलांडलेला पेस आणि तिशीतला बोपण्णा यांच्यावर आशा केंद्रित कराव्या लागतात, यातून अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अपयश स्पष्ट होते.

सेरेना नव्या विक्रमासाठी तयार
दुसरीकडे स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्सने एंजेलिक कर्बरसह दिग्गज खेळाडूंना धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याच्या निर्धाराने खेळणार असल्याचे तिने सांगितले. सेरेना विक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाला पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सेरेना बेनिसिचला पराभूत करण्यात यशस्वी ठरली, तर उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ फॉर्मात असेलल्या ब्रिटनच्या जोहाना कोंटा किंवा सहावे मानांकन प्राप्त डोमिनिका सिबुलकोव्हा यांच्यापैकी एकीसोबत पडण्याची शक्यता आहे. .