ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 277 धावा

0

बर्मिंगहॅम । इंग्लंडन ऑस्ट्रेलिया याच्यातील सामना होता.हा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा होता.इंग्लंड उपात्य फेरीत प्रवेश केला आहे.इंग्लंडने आतापर्यंत सरस कामगिरी करताना स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले. दुसरीकडे, कांगारूंना अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयासाठी उत्सुक आहे. कांगारूंचे आतापर्यंतचे दोन्ही सामने पावसामुळे अनिर्णीत राहिले.नाणेफेक जिकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तो त्यांच्या गोलंदाजानी सार्थक ही ठरविला. रशिद खान व मार्क वुड याच्यात फलंदाज बाद करण्याची एकप्रकारे चढा-ओढ लागली होती. कांगारू संघाकडून अ‍ॅरोन फिंच ( 68),कर्णधार स्टीव्हन स्मिथ(56) ,ट्रॅव्हिस हेड (71) धावा केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ षटकात 277 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल (20),सोडल्यास ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मॅथ्यू वेड 2, मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स 4,जोश हेझलवूड, अ‍ॅडम झंपा 0 बाद झाले. यामुळे कांगारू मोठी धाव संख्या उभारू शकली नाही.कांगारूना करो वा मरो अशी स्थिती असतांना खालील क्रमावारीतील फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही.

रॉसचा अप्रतिम झेल
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.तो त्यांच्या गोलंदाजानी सार्थक ठरविला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर व अ‍ॅरोन फिंच हे सलामीवीर मैदानावर आले. 7 षटकात कांगारूच्या 40 धावा झाल्या असतांना मार्क वुडने वार्नरला 21 धावावर झेलबाद केले. यानंतर स्टीव्हन स्मिथ कर्णधार मैदानावर आला.त्याने फिंच बरोबर भागीदारी करित दोघे फलंदाजानी अर्धशतके पुर्ण केले.कांगारू संघ 136 धावावर असतांना फिंच याला 68 धाव संख्येवर स्ट्रोक याने झेलबाद केले.मोझेस हेनरिक हा आला असता तो विशेष अशी कामगिरी करू शकला नाही.181 धावा संख्येवर कर्णधार स्टिव्हन स्मिथ् हा 56 धावांवर मार्क वूडने झेलबाद केले.यानंतर मोझेस हेनरिक याला 17 धावावर राशिद याने तंबूत परत पाठविले.ट्रॅव्हिस हेड व ग्लेन मॅक्सवेल यांनी संघाची जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न केला मात्र संघ 239 धावांवर असतांना मॉर्क वुडने टाकलेल्या चेडूला मॅक्सवेल सीमा रेषेबाहेर पाठविण्याच्या प्रयत्नासाठी टोलविला असतांना रॉस याने सीमारेषवर अत्यंत अप्रतिम असा झेल घेतला.त्यावेळेस मॅक्सवेल हा 20 धावावर खेळत होता.तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा झटका दिला. मॅथ्यू वेड (2),मिशेल स्टार्क(0), पॅट कमिन्स(4), अ‍ॅडम झंपा(0),असे एकापाठोपाठ बाद झाले. जोश हेझलवूड हा नाबाद राहिला.तर हेड 71 धावांवर बाद झाला.

गोलंदाजीत इंग्लंड सरस कामगिरी
यजमान इंग्लंडचे गोलंदाजही सरस कामगिरी करत आहेत.मार्क वूड 10 षटकात 4 गडी, बेन स्टोक्स 8 षटकात 1 गडी ,आदिल रशीद 10 षटकात 4 गडी बाद केले. गतसामन्यात प्लंकेटने बळींचा चौकार मारला होता मात्र ऑस्ट्रेलिया विरूध्द त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही.जेक बॉल 9,लियाम प्लंकेट 8, मोईन अली 5,षटके टाकली मात्र त्यांना एकही गडी बाद करता आला नाही.