एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अयोग्य भाषेमुळे वादात सापडलेल्या टिम पेनने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेनने सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी सायंकाळी होबार्ट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम पेनने यासंदर्भातील माहिती दिल्याचं वृत्त क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटने दिलं आहे.
“आज मी ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या कसोटी क्रिकेटमधील कर्णधार पदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा करतोय. हा माझ्यासाठी फार कठीण निर्णय होता. पण हा निर्णय माझ्या दृष्टीने, माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने आणि क्रिकेटच्या दृष्टीने महत्वाचा आहे,” असं टीम पेनने स्पष्ट केलं आहे.