ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाने केले अनोखे विक्रम!

0

इंदूर । भारतीय संघाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सात नवे विक्रम प्रस्थापित केले. वेस्ट इंडिज. श्रीलंका पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय क्रिकेटची मालिका जिंकताना भारतीय संघाने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. मालिकेतील दोन सामने अद्याप आहेत. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातील विजयाचे शिल्पकार कोहली वा पांड्या नाहीत हे आता लपून राहिलेले नाही. भारताचे प्रशिक्शक रवी शास्त्रींच्या एका निर्णयामुळे भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवू शकला. चेन्नईतील एकदिवसीय सामन्यात पांड्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्या सामन्यात त्याने 83 धावा करताना दोन विकेट मिळवल्या होत्या. तिसर्‍या सामन्यात चौथ्या नंबरवर खेळवण्याचा निर्णय शास्त्रींनी घेतला आणि त्याचा परिणाम सामन्यावर दिसला. पांड्याच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्स राखून हरवले. ज्यावेळी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मनीष पांडे खेळण्यासाठी उतरणार होता. तेव्हा रवी शास्त्रींनी पांडेला न पाठवता हार्दिकला मैदानावर पाठवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला. पांड्याने केवळ विराटला साथच दिली नाही, तर 78 धावांची दमदार खेळी केली.

भारतीय संघाचे विक्रम
1. सलामीवीर रोहित शर्माने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात 62 चेंडूंत 71 धावा केल्या. या डावात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन विक्रम बनवला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 63 षटकार मारणारा तो फलंदाज बनला आहे. हिटमॅन म्हणून ओळखला जाणार्‍या रोहितने न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्कुलमचा 61 षटकारांचा विक्रम मोडला आहे. रोहितने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात जलद 42 चेंडूत अर्धशतक साकारले. 2013 नंतर रोहितने 113 षटकार लगावले आहे. तर एबी डिविलिअर्सने 106, आयन मॉर्गन 100, मार्टिन गुप्टिल 96, जोस बटलर आणि कोहलीने 74 तर धोनीने 70 षटकार खेचले आहेत.

2 भारताने ऑस्ट्रेलियाला 3-0 ने पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे की भारताने कांगारू संघाविरुद्ध दोन मालिका शिल्लक असतांनाच मालिका जिंकली आहे.

3 हार्दिक पंड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला संघाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने परदेशात शेवटच्या 13 सामन्यांपैकी एकदिवसीय सामन्यात एकही विजय मिळवला नाही. हा एक वेगळा विक्रम बनला आहे.

4 कोहलीने एकदिवसीय सामन्यांत नववा विजय मिळवत धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 14 नोव्हेंबर 2008 पासून 5 फेब्रुवारी 2009 दरम्यान माही कर्णधार असतांना भारताने सलग नऊ एकदिवसीय सामने जिंकले आणि जुलैपासून कर्णधार कोहली आतापर्यंत नऊ सामने जिंकले. मालिका जिंकल्यानंतर भारताने सलग सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. 2007 मध्ये राहुल द्रविड कर्णधार असतांना, 2007 ते 09 धोनी कर्णधार असतांना आणि त्यानंतर धोनी आणि विराट संयुक्त कर्णधार असतांना भारतीय संघाने सहा एकदिवसीय मालिका जिंकल्या आहे.