ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी 4-0 ने जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही

0

मुंबई । 23 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होत आहे. हा दौरा ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक असेल. क्रिकेटमध्ये भाकीत करणे अवघड असते, परंतु भारताने ही मालिका 4-0 अशी जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही.कारण भारतीय संघाची सातत्यपूर्ण कामगिरी पाहिल्यास ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी मालिकेत 4-0 ने जिकल्यांस कोणतेही आश्चर्य वाटणार नाही असे मत भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले.

चांगले फिरकीपटू संघात

भारताने घरच्या मैदानावर 2012 नंतर एकही पराभव पत्करलेला नाही.भारतीय संघात प्रत्येक क्रिकेट पटू हा आपल्या जबाबदारीने व भारताला विजयाकडे नेण्यासाठी सर्वपरी प्रयत्न आपले कौशल्यपणाला लावून योगदान देत असतो.त्याचबरोबर गांगुली म्हणाला, फिरकीपटू.. हे एकमेव समीकरण, जे गेल्या 25 वर्षांत भारताला घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवण्यात मदत करत आहे. एकापाठोपाठ एक चांगले फिरकीपटू संघात येतच आहेत. मी कर्णधार असताना अनिल कुंबळे व हरभजन सिंग होते आणि आता रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा आहेत. तुम्ही कोणत्याही फिरकीपटूच्या हातात चेंडू सोपवा, तो विजय मिळवून देईल. मग तो अमित मिश्रा असो, युजवेंद्र चहल असो किंवा जयंत यादव असो. भारतात खेळताना फिरकीचा सामना करता आला पाहिजे आणि विजयासाठी चांगली फिरकी गोलंदाजीही करता आली पाहिजे.

गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2001 सालच्या मालिकेत पिछाडीवरून मुसंडी मारत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती. 113 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या गांगुलीने सध्याचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले.