ऑस्ट्रेलिया; दिवस अखेर 299 धावा

0

रांची ।ऑस्ट्रेलिया संघ 800 वा कसोटी व भारताविरूध्दच्या तिसर्‍या कसोटी सामन्याला आज सुरवात झाली.नाणेफेक जरी भारत हरला असला तरी भारताने सुरवातीच्या तीन सेशनमध्ये चांगली पकड केली होती. पहिल्या सेशनमध्ये भारताने 109 धावांवर 3 गडी ऑस्ट्रेलियाचे तंबूत पाठविले होते. दुसर्‍या सेशनमध्ये 85 धावा देत भारताने अजून एक गडी बाद केला.त्यामुळे 140 धावांमध्येच ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज बाद झाले होते.त्यामुळे दिवसाअखेर संपुर्ण संघ माघारी जाणार असे वाटत असतांना स्टिव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. दिवसा अखेर कर्णधार स्टिव्ह स्मिथ (117) आणि ग्लेन मॅक्सवेल (82) क्रिजवर खेळत होते. रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथमच कसोटीचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी आतापर्यंत चार वनडे आणि एक टी-20 सामना आयोजित केला होता. आता प्रथमच कसोटीचे यजमानपद भूषवण्याचा रांचीला संधी मिळाली आहे.याच बरोबर भारत व ऑस्ट्रेलियासाठी ही कसोटी जिकणे महत्वाचे आहे.त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 800 वी कसोटी खेळत आहे. त्यामुळे या कसोटीला विशेष महत्वप्राप्त झाले आहे.भारताने नाणेफेक हरला असला तरी भारतीय गोलंदाजानी पहिल्या तीन सेशन मध्ये चांगली गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला थांबवून ठेवले होते. पहिल्या सेशनमध्ये 109 धावा देवू 3 गडी बाद केले तर दुसर्‍या सेशनला 85 धावा देवून 1 फलंदाज बाद केला.तर तिसर्‍या सेशनला फलंदाज जरी बाद करता आला नसला तरी105 धावा घेण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी झाले.दिवसा अखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 299 अशी होती.

कसोटीत विराट जखमी
भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्या रांची येथे तिसरी कसोटी सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षण करतांना खांद्याला लागून जायबंदी झाला. लंच ब्रेकनंतर खेळ सुरू झाल्यावर 39.1 ओव्हरमध्ये पीटर हँड्सकॉम्बने रविंद्र जडेजाच्या चेंडूवर एक सणसणीत चौकार लगावला. कोहलीने तो बॉल अडवण्यासाठी झेप घेतली. कोहलीने तो बॉल तर अडवला पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर कोहलीने मैदान सोडले. कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नसली तरी तो मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट कोहलीच्या जागी राखीव खेळाडू अभिनव मुकुंद सध्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला आहे तर अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडतोय.

पाचव्या विकेटसाठी 100 पार्टनरशिप धावांची भागिदारी
ऑस्ट्रेलियाचा डाव बारगळत असतांना स्मिथ व मॅक्सवेलने संयमी पारी खेळत 189 चेंडूत 100 धावांची पार्टनरशिप केली.मॅचमध्ये स्टिव्ह स्मिथने आपल्या करिअरमधील 19वे शतक 227 चेंडूत पूर्ण केले. शतकी खेळीमध्ये स्टिव्हने 11 चौकार लगावले.भारताच्या विरोधात स्टिव्हचे हे 6वे शतक आहे. मॅक्सवेलने आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. 95 बॉलमध्ये मॅक्सवेलने अर्धशतक पूर्ण केले. आपल्या खेळीदरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. टेस्ट करिअरमधील मॅक्सचा हा चौथा कसोटी
सामना आहे.

असे बाद झाले फलंदाज
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 9.4 ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने डेविड वॉर्नरची विकेट घेतली .स्वत:च्या चेंडूवर जडेजाने झेल घेतला वॉर्नरला 19 धावावर परत तंबूत पाठविले.22व्या ओव्हरमध्ये मॅट रॅनशॉने उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्लिपरमध्ये विराट कोहलीकडे झेल दिला. तिसरी विकेट 25.1 ओव्हरमध्ये आर.अश्विनने शॉन मॉर्शचा झेल चेतेश्‍वर पुजारने पकडला. मात्र मैदानावरील पंचांनी शॉन मॉर्शला आउट देण्यास नकार दिला. तेव्हा भारतीय टीमने रिव्ह्युची मागणी केली. रिव्ह्युमध्ये पुजारीने शॉन मॉर्शचा झेल बरोबर घेतल्याचे सिध्द झाले आणि निकाल भारताच्या बाजुने लागला. चौथी विकेट लंचब्रेकनंतर पडली. 42.0 ओव्हरमध्ये उमेश यादवने पिटर हँड्सकॉम्बला श्रलु आउट केले. भारताचा रिव्ह्यु वाया गेला 56.1 ओव्हरमध्ये इशांत शर्माच्या चेंडुवर भारतीय खेळाडुंनी ग्लेन मॅक्सवेलच्या श्रलु आउटसाठी अपिल केले होते. मात्र ग्राउंड अंपायरने हे अपिल फेटाळून लावले. त्यामुळे भारताने रिव्ह्युची मागणी केली. मात्र रिव्ह्युमध्ये इंशात शर्माने नो-बॉल टाकल्याचे दिसून आल्यामूळे भारताचा रिव्ह्यु वाया गेला.

800 वी कसोटी
रांची । भारता विरूध्दची तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियन टीम खेळत आहे.ही कसोटीतील तिसरी जरी असली तरी कांगारू संघाचा तो 800 व्या कसोटी आहे.800 वी कसोटी कोहलीच्या टीम इंडियाच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसर्‍या कसोटीला सुरुवात होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक विजय संपादन केला आहे. दुसरीकडे आपल्या 800 व्या कसोटीत शानदार विजय संपादन करण्याचा ऑस्ट्रेलियन टीमचा मानस आहे. मात्र, यासाठी या टीमला कसरत करावी लागेल. कारण गत दुसर्‍या कसोटीत पुनरागमन करताना भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.