ओंकारेश्‍वर मंदिराजवळून मोटारसायकल लंपास

0

जळगाव। वसंत सुपर शॉपीतील महिला कर्मचारीची शॉपीच्या बाहेर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनी एमआयडीसी येथील रहिवासी प्रकाशचंद भवरलाल जैन यांनी त्यांची मोपेड दुचाकी (क्रं.एमएच.19.डब्ल्यु.3850) ही वाघ नगरातील गिता रमण शर्मा यांना विक्री केली आहे. दरम्यान, गिता शर्मा या ओंकारोश्‍वर मंदिराजवळील वसंत सुपर शॉपी येथे कामाला असून 25 जुलै रोजी नेहमी प्रमाणे शर्मा ह्या मोपेड दुचाकीने कामावर आल्या. यावेळी त्यांनी शॉपीच्या बाहेरच दुचाकी उभी केली. दुपारी 3.40 वाजेच्या सुमारास गिता शर्मा ह्या शॉपीच्या बाहेर आल्या तेव्हा त्यांना त्यांनी दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता कोठेही आढळून न आल्याने अखेर दुचाकी चोरी झाल्याची खात्री झाली.