भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्रकार
भुसावळ– उच्च क्षमतेच्या ओएचई टॉवरवर मनोरुग्ण चढल्याने सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 40 ते 50 वर्षीय मनोरुग्ण इसमाने प्लॅटफार्म क्रमांक तीनवरून उच्च क्षमतेच्या ओएचई इलेक्ट्रीक टॉवरवर चढल्याने प्रवाशांनी धाव घेतली. गेल्या तासाभरापासून हा इसम टॉवर बसलेला असून त्याची सारखी बडबड सुरू आहे.