जळगाव । केसीई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यलयामधील ओजास्विनी कला विभागातील पूनम राणा या विद्यार्थींची निवड स्पेनमध्ये रेसिडन्सी तीन महिन्याकरिता निवड झाली आहे. पूनम राणा हीने 57व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभागातून संपूर्ण महाराष्ट्रातून पूनमने काढलेल्या मोहेंजोदडो या कलाकृतीला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.
पूनमने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहागीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आहे होते. स्पेनमध्ये निवड करण्यात आलेल्या 16 देशांतील 16 कलाकारांमध्ये भारतातून पूनमची निवड झाली आहे. तीच्या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू.जे. प्राचार्य उदय कुळकर्णी, ओजस्विनीचे संचालक ए.डी. काटे, प्रा. योगेश लहाने, प्रा. पुरूषोत्तम घाटोळ आदींसह विद्यार्थ्यांनी पूनम राणाचे अभिनंदन केले आहे.