कोलकाता । भारतीय संघाचा कसोटी गोलंदाज प्रग्यान ओझा आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. तणाव एवढा वाढला आहे की बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अद्याप ओझाशी संपर्कही झालेला नाही. त्यामुळे ओझाच्या नावाशिवायच बंगाल संघाची घोषणा करण्यात आली. प्रग्यान ओझा बंगालकडून दोन सत्र खेळला. त्यानंतर त्याला हैदराबादला परतायचे होते. मात्र, बंगाल असोसिएशनने त्याला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली. तेव्हापासून ओझाशी असोसिएशनचा अद्याप संपर्क झालेला नाही. प्रग्यान ओझाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या नावाशिवायच संघ जाहीर करावा लागला, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव अविषेक डालमिया यांनी दिली.
ओझा त्याचे प्रशिक्षक साईराज बहुतुले यांच्या मार्गदर्शनाखालील सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता. बंगालचा 17 खेळाडूंचा संघ श्रीवत्स गोस्वामीच्या नेतृत्वात खेळणार आहे.