कल्याण : ऑनलाइन व्यवहार सोयीचे असल्याचे सांगितले जात असले तरी या व्यवहारात निष्पाप नागरिकाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे दररोज घडणार्या घटनामधून समोर येत आहे. मात्र या आरोपीना पकडणे मुश्किल होत असल्यामुळे दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहाराची नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. चोरट्याकडून ग्राहकांना या व्यवहारात फसविण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असल्यामुळे पोलीस देखील हैराण आहेत. निळजे येथे राहणार्या विवेक कुमार मेहता त्याना कन्ज्यूमर फोरममधून बोलत असल्याचे सांगत त्यांना विश्वासात घेत त्याच्या डेबिट कार्डाची माहिती घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मिळवून त्याच्या आधारे त्यांच्या खात्यातून तब्बल 6 वेळा ट्रान्झेक्शन करत 90 हजार रुपये काढून घेतले. त्यांच्या मोबाईलवर त्याच्या खात्यातून रक्कम काढली गेल्याचा मेसेज येताच त्यांनी ही रक्कम कोणी काढली याचा शोध घेतला असता 7579891286 या मोबाइल क्रमांकावरून शशीरंग या व्यक्तीने काढल्याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी शशीरंग नावाच्या व्यक्तीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.