ओढरे येथे आरोग्य दिनानिमित्त नैराश्यांवर व्याख्यान

0

चाळीसगाव। साद फाऊंडेशन, विकास सेवा नेहरू युवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन चाळीसगाव तालुक्यातील ओढरे येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ रोटेरियन रामभाऊ शिरूडे, तळेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. मानवी जीवनात नैराश्य आल्याने आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त होते. नैराश्य न येण्यासाठीताणतणाव येऊ न देता सुखी , निरोगी व आनंदी आयुष्य जगावे असा सल्ला डॉ.प्रमोद सोनवणे यांनी दिला. विद्यार्थी – विद्यार्थीनीने आईवडिलांना शौचालय बांधण्याचा आग्रह धरावा असे सांगितले.

डॉ. प्रिती वर्मा यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठीचे उपचार व प्रतिबंधक उपाय सांगितले. शिरूडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी जीवनात पास नापास झाले तरी खचू नये व आत्महत्या करू नये असा सल्ला दिला. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर.बी जाटीया, सरपंच रूखमाताई निकम, शास्त्री नगरचे सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब महाजन , सुनिल राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली निकम, कल्पतेश देशमुख, विकास राठोड, हेमंत तोंडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.