ओढा बुजविणार्‍या व्यावसायिकावर केली कारवाई

0
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : नैसर्गिक स्त्रोत असलेला ओढा बुजवून त्यावर बांधकाम करणार्‍या एका प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकावर तळेगाव दाभाडे नगर परिषदेने  कारवाईची नोटीस बजावली आहे. चालू असलेले काम थांबविण्याचे आदेश मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिले आहेत. यामुळे बेकायदा काम कारणार्‍या व्यवसायिकांना चांगला चाप बसला आहे. तळेगाव दाभाडे येथील श्रीनगरीमध्ये येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक यांचे चार माजली इमारातीचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम श्रीनगरीच्या वसाहती जवळील नैसर्गिक स्त्रोत्र असलेल्या नाल्याजवळ चालू आहे. हे  काम या नाल्याला बुजवून चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी नगर परिषदेकडे दिल्या होत्या. त्याची दाखल घेऊन मुख्याधिकारी वैभव  आवारे, नगररचनाकार शरद पाटील, बीट अधिकारी संभाजी भेगडे, उद्यान निरीक्षक विशाल मिंड, तसेच नगरसेवक अरुण भेगडे पाटील,  अमोल शेटे, माजी सभापती अशोक काळोखे वृक्षसमिती सदस्य मंदार खोल्लम, निलेश गराडे व कर्मचारी वर्ग यांनी समक्ष जाऊन जागेवर  पाहणी केली. नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी याचा पंचनामा केला.
या बांधकाम व्यावसायिकास नगर परिषदेकडून याबाबतचा खुलास करण्याची नोटीस पाठविली आहे. त्याबाबत योग्य माहिती आल्यास  पुढील कारवाई होईल असे मिख्याधिकारी आवारे यांनी सांगितले. हे काम करत असताना त्याच्या आड येणारी काही झाडे परवानगी न  घेता तोडली असल्याचे आढळून आले असून याबाबत कारवाई करणार असल्याचे उद्यान निरीक्षक विशाल मिंड यांनी सांगितले.