ज्ञानेश वाकुडकर ; ओबीसींवर अनेक वर्षांपासून होते अन्याय
मुक्ताईनगर- महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसीचा झाला नाही त्यामुळे 52 टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात याव,े अशी मागणी लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकर यांनी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत केली.
आठ विषयांसाठी महाराष्ट्रव्यापी यात्रा -वाकुडकर
महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज असून आतापर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही, तसेच आरक्षण देखील त्यांना केवळ 16 टक्के मिळत आहे. नोकर्यांमध्ये ओबीसींचा मोठा भरणा असून ओबीसींचे लचके तोडले जात असल्याचा आरोप वाकुडकर यांनी पत्रकार परीषदेत केला. त्यासाठी विदर्भ व्यापी लोकजागर यात्रा काढण्यात येत असून झिरो बजेट लोकशाही, गाव तिथे उद्योग, कृषी धर्म व कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परीवार, युवा भारत नवा भारत, गतिशील न्यायालय व पारदर्शी न्याय या आठ विषयांवर महाराष्ट्र व्यापी यात्रेची वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वाकुडकर यांच्या सोबत लोकजागरचे संयोजक बाबासाहेब भोयर, गोविंद पाटील, शिवचरण उज्जैनकर, धनंजय सापधरे, नितीन भोंबे, प्रमोद पिवटे, जयवंत बोदडे, रा.का.ढोले, प्रवीण बडगुजर, विजय शूरपाटणे, गणेश बुडूकले तसेच मोठ्या संख्येने विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.